पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील चारही आमदारांचे शनिवारी अभिनंदन केले. पुणे येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांनी आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमाताई खापरे यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, “तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे अत्यंत चांगले यश संपादन केले आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास आपल्या कार्यातून सार्थ ठरवा.” तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

“जोमाने कामाला लागा, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करा,” असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारही आमदारांना दिला. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे आगामी काळात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
























Join Our Whatsapp Group