चिंचवड (Pclive7.com):- राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची (गुटखा) विक्री केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई (दि.१६)रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड स्टेशन रोडवरील दर्पण टी स्टॉल, टाटा मोटर्स कंपनीसमोर करण्यात आली आहे. या कारवाईत २० हजार ५३४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अंमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई गोविंद देवराम डोके यांनी फिर्याद दिली आहे. दर्पण कुमार ललनगिरी (वय ३१) आणि पियुष कुमार ललनगिरी (वय २६), दोघेही रा. विश्वेश्वर बिल्डिंग, धन्वंतर मंदिराजवळ, चिंचवडगाव, यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला आदी पदार्थांची साठवणूक व विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या कारवाईदरम्यान सुमारे २० हजार ५३४ रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
























Join Our Whatsapp Group