पिंपरी (Pclive7.com):- धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर उद्या पुणे मेट्रो (पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रो) ची प्रवासी सेवा सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सणाच्या निमित्ताने प्रवाशांची कमी होणारी गर्दी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दुपारी ३ वाजल्यानंतर मात्र मेट्रोची सेवा नियमित वेळापत्रकानुसार पुन्हा सुरू होईल आणि रात्री ११ वाजेपर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध राहील. मेट्रो प्रशासनाने सर्व प्रवाशांना याची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे सांगितले आहे.























Join Our Whatsapp Group