पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.१३ मधील निगडी जकात नाका येथे असणाऱ्या बीआरटी बस स्टॉपला “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल” असे नाव देण्यात आले आहे. या बस स्टॉपला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे अशी मागणी मनसेच्या माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांनी केली होती. त्यांच्या त्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.
अश्विनी चिखले यांनी सर्वप्रथम या नामकरणाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा देखील केला होता. त्या अनुषंगाने महापालिकेत दि.१८/११/२०१५ रोजी ठराव क्र.२५ विषय क्र.५ मांडला होता. त्याचे अनुमोदक हे नगरसेवक राहूल जाधव हे होते.सदर मागणी पाहता उपरोक्त ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला होता. तसेच हा बस स्टॉप वापरासाठी लवकरात लवकर खुला करणेकामी ही संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर आज दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी निगडी भक्ती-शक्ती चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मीनल्सचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात येणार आहे. या नामकरणासाठी माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांनी केलेली मागणी, आणि विद्यमान नगरसेवक सचिन चिखले यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
























Join Our Whatsapp Group