पिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘झी’ दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेच्या प्रमुख कलावंतांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिंचवड वाल्हेकरवाडी येथील ‘आहेर गार्डन’या ठिकाणी शनिवारी दि.२९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.
डॉ.अमोल कोल्हे (छत्रपती संभाजी महाराज फेम), शंतनु मोघे (छत्रपती शिवाजी महाराज फेम), निलेश मयेकर (झी मराठीचे बिझनेस हेड), सोजल सावंत (वरिष्ठ कार्यकारी निर्मात्या, झी मराठी), प्रताप गंगावणे (लेखक), कार्तिक केंढे (दिग्दर्शक) आदी मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ या कलावंतांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहणार आहे. काही जागा राखीव असणार आहेत. ‘दिशा’चे अध्यक्ष गोरख भालेकर व कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी ही माहिती दिली.