पिंपरी (Pclive7.com):- कोयत्याने वार करत एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी भोसरी येथे उघडकीस आली. सनाऊल हक सय्यद शेख (वय ३२, सागर लांडगे चाळ, भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दशक्रिया जवळील मोकळ्या मैदानात एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाने भोसरी पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एका व्यक्तीचा खून झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाजवळील कागदपत्रांची पाहणी करून त्यानुसार संपर्क केला असता आलेल्या व्यक्तींनी मयताची ओळख पटवली.
मयत व्यक्तीचे भोसरीमध्ये भागीदारीत रस्त्यावर तीन ठिकाणी ज्यूसचे गाळे आहेत. रात्री दहा वाजताच्या सुमारास दोघे जण त्यास बोलविण्यासाठी आले होते. त्यानंतर पुन्हा ते आपल्या घरी आले नाहीत. सकाळी त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. भोसरी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.





















Join Our Whatsapp Group