पुणे (Pclive7.com):- हडपसर येथील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड मधील १३१ कायमस्वरूपी कामगारांना बडतर्फ करण्यात आले होते. पुन्हा कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी या कामगारांनी आज कुटुंबासह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले होते. मात्र यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून या कामगारांना बाजूला करून ताब्यात घेतले आहे. व्यवस्थापनाने पोलीसांना हाताशीधरून हे आंदोलन बळाचा वापर करून उधळून टाकण्याचा प्रयत्न केला असून यावेळी पोलीसांनी लाठीचार्ज केला असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
हडपसर येथील किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनीतून काढून टाकलेले कामगार आज कंपनीच्या प्रवेशद्वारावर आपल्या कुटुंबियांसमवेत आज आले होते. कामावर परत घ्यावे यासाठी मागील ४१ दिवसांपासून मागणी करीत होते. आज कंपनीचे संचालक राहुल किर्लोस्कर हे प्रवेशद्वारावर आले असताना कामगारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे न देता ते निघून गेले. यामुळे संतप्त झालेले कामगार प्रवेशद्वारावर बसून राहिले.
या कामगारांना तेथून घालवून देण्यासाठी पोलिसांनी या कामगारांवर सौम्य लाठीमार केला. त्यावेळी पोलिसांना अडविण्यास गेलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.





















Join Our Whatsapp Group