पिंपरी (Pclive7.com):- पुण्यात गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल निलिमा गायकवाड यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वांकडून कौतुक होत आहे. स्वतः पाण्यात उतरुन एका लहान मुलाला आपल्या पाठीवर घेऊन निलिमा यांनी अत्यंत्य धाडसाने आपले कर्तव्य पार पाडले. आपत्कालिन परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय कार्याची सर्वत्र चर्चा आहे. निलिमा गायकवाड या दत्तवाडी पोलीस चौकीच्या महिला कॉन्स्टेबल आहेत. या ‘लेडी सिंघम’चा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने सन्मान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संघटक वर्षा जगताप यांच्या हस्ते निलिमा गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. कविता खराडे, गंगाताई संजय धेंडे, मेघना जगताप, ज्योती शिंदे तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास हिरवे व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group