मुंबई (Pclive7.com):- चित्रपट निर्माता साजिद खानवर नुकतंच ३ महिलांनी लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर आता अक्षयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अपराधीसोबत चित्रपट करणार नसल्याचे म्हणत अक्षयने ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबवलं आहे.
साजिद खान हाऊसफुल ४ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. अक्षयच्या या ट्विटमुळे साजिद खानची या चित्रपटातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाबाबत सर्व चौकशी पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्याची विनंती अक्षयने ‘हाऊसफुल ४’च्या निर्मात्यांना केली आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही दोषी गुन्हेगारासोबत काम करणार नाही. मला वाटते, अन्याय झालेल्या व्यक्तीची बाजू पूर्णपणे ऐकून घ्यायला हवी. तसेच तिला पूर्ण न्याय मिळायला हवा असेही अक्षयने यावेळी म्हटलं.

























Join Our Whatsapp Group