पिंपरी (Pclive7.com):- दोन सराईत वाहन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून ४ लाख रुपये किंमतीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आकाश राजाभाऊ शिंदे (वय-१९), अक्षय अनिल लोमटे (वय-१९, दोघे रा. खराबवाडी, चाकण) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत वाहनचोर आकाश शिंदे हा चाकण बाजारपेठ येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सचिन उगले यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सचिनला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळ असणारी दुचाकी चोरीची असल्याचे समोर आले. त्याला अटक करून तपास केला असता त्याने साथीदार अक्षयच्या मदतीने वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
अक्षयला ताब्यात घेतले असता दोघांकडून चाकण पोलीस ठाण्यातील तीन, निगडी आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किमतीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार राजू केदारी, प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, आशिष बोटके, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रवीण पाटील, विशाल भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
























Join Our Whatsapp Group