पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात बनावट ब्रँडेड फुटवेअर विक्री करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी कारवाई करत तब्बल 8 लाख 30 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील “विकी फूट वेअर” या दुकानात नामांकित कंपनीच्या नावाने बनावट शूज, चप्पल आणि फ्लिप-फ्लॉप विक्री केली जात असल्याची माहिती कंपनीच्या कॉपीराइट विभागाला मिळाली होती. त्यानुसार कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांनी परिसरात पाहणी केली असता संबंधित दुकानात त्यांच्या उत्पादनासारखे दिसणारे बनावट साहित्य आढळून आले. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पंचनामा करत दुकानात छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात बनावट फुटवेअर साठा आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 64 हजार 250 रुपये किमतीचे 1057 जोड फ्लिप-फ्लॉप, 4 लाख 79 हजार रुपये किमतीचे 985 जोड शूज तसेच 87 हजार रुपये किमतीच्या 348 जोड चप्पला असा एकूण 8 लाख 30 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी विकी फूट वेअरचे मालक विकास उर्फ विकी विनोदकुमार रामनानी यांच्याविरोधात कॉपीराइट कायदा व भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.



















Join Our Whatsapp Group