पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना उपनेत्या तथा स्थायी समिती सदस्या नगरसेविका सौ. सुलभाताई रामभाऊ उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार दि.२९ मार्च रोजी यमुनानगर रुग्णालय येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये विविध आजारांवर मोफत तपासणी व उपचार सल्ला दिला जाणार असून, डोळे, दंत, हाडे तसेच त्वचारोग यांसारख्या विभागातील तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, गटनेते विश्वजीत बारणे तसेच शहरप्रमुख निलेश तरस यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमाचे आयोजन चेतना हॉस्पिटल व अजिंक्य रामभाऊ उबाळे सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले असून, आरोग्यसेवेतून समाजहित साधण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group