पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड स्टेशन परिसरात आज रस्त्यालगत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान एक ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे शहरातील सुरू असलेल्या रस्ते कामांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी रस्त्याच्या कडेला खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान तोल जाऊन ट्रक उलटला. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरात सध्या विविध ठिकाणी रस्ते कामे सुरू असून, अनेक ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना न करता काम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स, सूचना फलक किंवा इशारे नसल्यामुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होत आहे.

यापूर्वीही अशाच प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. ठेकेदारांच्या बेफिकीर कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करणार का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.



















Join Our Whatsapp Group