पिंपरी (Pclive7.com):- हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांना एमएनजीएल गॅस पुरवठ्यात जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याच्या तक्रारींवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून पुरवठा रोखला जात असेल, तर संबंधितांवर सरकारकडून कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचनांनुसार हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांना एमएनजीएल गॅस पुरवठा सुरळीतपणे केला जाणे अपेक्षित आहे. मात्र काही ठिकाणी जाणीवपूर्वक विलंब होत असल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे सामंत यांनी नमूद केले. “कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम अडथळे निर्माण करून उद्योगांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अशोक खरात सीडीआर प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले की, “ज्यांच्याशी फोनवर संवाद झाला, त्या नेत्यांनी अशोक खरातच्या कृत्याचे समर्थन केलेले नाही. संबंधित व्यक्तीने नेत्यांशी झालेल्या संभाषणाचा गैरफायदा घेत चुकीचे कृत्य केले आहे.” अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर एमएनजीएलकडून गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून पुढील पावले उचलली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.





















Join Our Whatsapp Group