पिंपरी (Pclive7.com):- वायसीएम रुग्णालयातील रुग्णांना मोफत भोजन देणाऱ्या महाराजा आग्रसेन किचन ट्रस्टचे चिंचवड येथे शनिवारी उद्घाटन होणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सीए कृष्णलाल बंसल यांनी दिली.
शनिवारी दि.१५ रोजी दुपारी ३ वाजता चिंचवड स्टेशन येथील अग्रसेन भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे, मोरया गोसावी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दानशूर व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. अगरवाल समाजातील काही कार्यकर्ते एकत्र येवून (१० ऑक्टोबर १८) महाराजा अग्रसेन जयंतीच्या दिवसापासून वायसीएम रुग्णालयात हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णांना मोफत भोजन पुरवठा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एम ए हुसैन यासाठी यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. आजतागायत ४ हजार रुग्णांनी लाभ घेतला. भविष्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रुग्णालयात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सीए बंसल यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजनासाठी सचिव मुकेश अगरवाल, खजिनदार संजीव आगरवाल यांनी पुढाकार घेतला घेतला आहे.





















Join Our Whatsapp Group