पिंपरी (Pclive7.com):- चाकण येथील मराठा आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आयुक्त पद्मनाभन म्हणाले की, चाकण येथे 30 जुलै रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून आंदोलन झाले. हे आंदोलन दुपारी एक ते दीड वाजताच्या दरम्यान संपले. त्यानंतर काही समाजकंटकांनी मराठा आंदोलनाच्या नावाखाली हिंसक कारवाया केल्या. त्या ठिकाणी तोडफोड करणार्यांचे फोटो आणि चित्रफीत पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यास सुरवात केली आहे. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणार्यांचे फोटो दाखविले. त्यावेळी ते तरुण आमचा कार्यकर्ता नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे चाकण हिंसाचाराशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.





















Join Our Whatsapp Group