पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १० मोरवाडी येथील पिंपरी चिंचवडमधील आनंदधाम स्मशानभूमी व दफनभूमीच्या कामाची महापौर राहुल जाधव यांनी पाहणी केली.
अक्षरधाम स्मशानभूमीच्या जवळ असणारी स्मशानभूमीस सर्व धर्मीय स्मशानभूमी नाव दयावे अशा सूचना महापौरांनी केल्या. काही किरकोळ कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.
ही स्मशानभूमी सुसज्ज झाली पाहिजे. तसेच स्मशानभूमीचे नूतनीकरण आराखडा तयार आहे. लवकरच ही स्मशानभूमी नव्याने तयार होईल. अक्षरधाम येथील अलिकडच्याबाजूस असणाऱ्या स्मशानभूमीस सर्व धर्मीय स्मशानभूमी नाव द्यावे, तसेच याठिकाणी असणारे नळ, येथील स्वच्छता राखावी. याचा नूतनीकरणचा आराखडा तयार आहे.
यावेळी ‘अ’ प्रभाग अध्यक्षा व नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक केशव घोळवे नगरसेवक तुषार हिंगे ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी आशा दुर्गुडे, कार्यकारी अभियंता सुपेकर, स्थापत्यचे प्रताप मोरे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group