पिंपरी (Pclive7.com):- वाकड परिसरातील बेंगळुरू–मुंबई महामार्गावरील वाकड पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्याने परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका तथा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्य श्रुती राम वाकडकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

सध्या सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाकड, पुनावळे, ताथवडे, हिंजवडी आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत असून प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे.

वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने वाकड पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काम अपूर्ण राहिल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, तसेच काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, आयुक्तांनी या समस्येची तातडीने दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे.




















Join Our Whatsapp Group