पिंपरी (Pclive7.com):- स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे जाऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश नवले यांनी राहुल गांधी यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती भेट दिली. तसेच महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या समतेच्या, प्रेमाच्या व मानवतेच्या संदेशाचा परिचय करून देत आळंदी, देहू आणि पंढरपूर येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले.

संदेश नवले यांनी राहुल गांधी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असून, देहू येथे संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर आहे. तसेच पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आपण महाराष्ट्रात यावे, अशी विनंती आहे.

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा आत्मा असून, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत चोखामेळा यांनी भक्तीच्या माध्यमातून समाजातील विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धांविरोधात जनजागृती केली. त्यांच्या समतेच्या आणि मानवतेच्या विचारांचा संदेश आजही समाजाला दिशा देत आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी संदेश नवले यांनी, “राहुल गांधी यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी, देहू आणि पंढरपूर येथे भेट दिल्यास काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि पक्ष संघटन अधिक बळकट होईल,” असे मत व्यक्त केले.




















Join Our Whatsapp Group