वाकड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांच्या वतीने वाकड व पिंपळे निलख मधील नागरिकांसाठी ST स्मार्ट कार्ड व NCMC कार्ड मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाकड येथील स्नेहा रणजित कलाटे जनसंपर्क कार्यालयात आयोजित या तीन दिवसीय शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरामध्ये ७०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत ST स्मार्ट कार्ड व NCMC कार्ड योजनेचा मोफत लाभ घेतला. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली व शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांची माहिती देण्यात आली. तसेच NCMC कार्डच्या माध्यमातून डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी, नागरिकांना एकाच कार्डद्वारे विविध सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले.
भविष्यातही नागरिकांच्या सोयीसाठी अशा लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी सांगितले.




















Join Our Whatsapp Group