पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या उपशहर प्रमुख पदी राहुल गरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार आणि पक्ष संघटन बळकट करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. राहुल गरड यांची भोसरी विधानसभा क्षेत्रासाठी उपशहरप्रमुख म्हणून एका वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या तथा नगरसेविका सुलभा उबाळे, शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे, बाळासाहेब वाल्हेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्तीनंतर राहुल गरड यांनी पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे सांगितले.




















Join Our Whatsapp Group