पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आणि शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत शहरात भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी रक्तदानाची सोय करण्यात आली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघांतर्गत काळेवाडीतील पार्वती इंग्लिश मीडियम स्कूल (संपर्क: ९९२३५०८९८६), थेरगावमधील गुजर नगर येथील प्रेरणा शाळा (संपर्क: ९६३७८३१२१२ व ७७२२०२४४४४), पिंपळे सौदागर येथील बासरी बॅंक्वेट हॉल, पिंपळे गुरवमधील रामकृष्ण मंगल कार्यालय आणि ढोरे नगरची मनपा अहिल्यादेवी होळकर शाळा (संपर्क: ७७४४०१३१२३), वाल्हेकरवाडीतील दत्त मंदिर (संपर्क: ९८२२४०७०७१), प्राधिकरण सेक्टर २६ (संपर्क: ९०४९७२२२८०), तसेच चिंचवड येथील नोवेल इंटरनॅशनल स्कूल, आकुर्डी गाव (संपर्क: ८६००३२८९४६) या केंद्रांवर शिबिर पार पडेल.
भोसरी विधानसभा मतदारसंघांतर्गत चिखलीतील ज्येष्ठ नागरिक संघ हॉल (संपर्क: ९९६०६८६८६१) व कुदळवाडीचे विठ्ठल मंदिर (संपर्क: ९१७५४८३०३०), दिघी-गव्हाणे वस्ती परिसरात मृणाल बॅंक्वेट हॉल (संपर्क: ९३७१०४६३३३), माजी सैनिक भवन (संपर्क: ८९७५९१३८२७), दिघी रोडवरील विदर्भ मित्र मंडळ (संपर्क: ९८२२१४०७७७) आणि भोसरी पीसीएमसी चौक येथील बहुउद्देशीय हॉल (संपर्क: ७०२८२७२१३५) येथे रक्तदान करता येईल. याशिवाय मोशी-चऱ्होली परिसरातील बोऱ्हाडेवाडी येथील निखील बोऱ्हाडे संपर्क कार्यालय (संपर्क: ९७६७४१५२५७), चऱ्होलीगावचे श्री वाघेश्वर महाराज विरंगुळा केंद्र (संपर्क: ९७६२५६५६००) आणि मोशीच्या शिवाजीवाडीतील शिव क्लासिक बिल्डिंग (संपर्क: ९७६२१५७६१३) येथेही सोय करण्यात आली आहे.

तसेच, धावडे वस्ती, इंद्राणीनगर व नेहरू नगर भागात अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर (संपर्क: ७०२०५७२२९०), लांडगे वस्तीतील दत्तमंदिर (संपर्क: ८०१०८९९७००), इंद्राणीनगरचे नम्रता लोढे जनसंपर्क कार्यालय (संपर्क: ९६०७२०१०१०), भोसरी खांडे वस्तीचा धम्मचक्र बौद्धविहार (संपर्क: ९९२११८९०८९) आणि मोशी प्राधिकरण संत नगरची गणेश मंदिर हाऊसिंग सोसायटी (संपर्क: ९९२१५०१९९३) येथे शिबिराचे आयोजन केले आहे. तळवडे-यमुनानगरमधील रुपीनगरचे हनुमान मंदिर (संपर्क: ८४८३९१८९१८) आणि यमुनानगरचे ठाकरे ग्राउंड (संपर्क: ८७९६५ २५६९१) या ठिकाणांचाही यामध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी दिले आहे.





















Join Our Whatsapp Group