पिंपरी (Pclive7.com):- सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका निवृत्त नागरिकाची ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलीसांत एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णकली, जगताप इस्टेट, पिंपळे गुरव येथील रहिवासी मारुती मुकींदा शिकरे (वय ६५, निवृत्त) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी संजय श्रीरंग सोनोने (रा. पातूर, जि. अकोला) याने २०२४ मध्ये फिर्यादींच्या जावयाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

आरोपीने नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत फिर्यादींकडून तब्बल ९ लाख रुपये स्वीकारले. मात्र, कोणतीही नोकरी न लावता तसेच घेतलेली रक्कम परत न करता विश्वासघात व फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group