पिंपरी (Pclive7.com):- देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने दिनेश यादव मित्र परिवार यांच्या वतीने कुदळवाडी येथील यादवनगर परिसरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी हनुमान मंदिरात उपवास फराळ वाटप कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले व हरिनामाच्या गजरात सहभागी होत उपवास फराळाचा लाभ घेतला.

हा कार्यक्रम स्व. वै. वामन महाराज यादव, कै. नथु खंडु यादव, कै. बबाबाई नथु यादव, कै. सुदाम नथु यादव आणि कै. गुलाब नथु यादव यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंदिर परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश यादव मित्र परिवार, कुदळवाडी-चिखली, यादवनगर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी आयोजकांचे अभिनंदन करत अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.




















Join Our Whatsapp Group