तळेगाव (Pclive7.com):- ३० टक्के जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका जेष्ठ नागरिकाची ९ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात मनोज गोपाळ देसले (रा. काळेपडळ, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप नारायण वडेलकर (वय ७०, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज देसले याने फिर्यादीला “माझ्याकडे पैसे गुंतवा, बँकेपेक्षा जास्त म्हणजे ३० टक्के परतावा मिळवून देतो,” असे सांगून विश्वास संपादन केला.

ऑक्टोबर २०२३ ते २० सप्टेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने वेळोवेळी धनादेश, यूपीआय आणि रोख स्वरूपात एकूण ९ लाख ७० हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे रक्कम परत न करता तसेच अधिक परताव्याचे खोटे आश्वासन देत फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोवारकर हे करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group