
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ ने मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सुशिक्षित तरुणाला अटक करून तब्बल २२ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरातील २२ चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून सुमारे १२ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सचिन पांडुरंग मरळे (वय ३३ वर्ष सध्या रा. ढोरे पाटील फार्म, भावसार यांचे घरात भाडेकरु, जुनी सांगवी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या उद्देशाने सुशिक्षित तरुणाने विविध भागांतून मोटारसायकली चोरी करून त्या कमी किमतीत विक्री केल्या. गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळांवरील २५० ते ३०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा माग काढला.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सचिन पांडुरंग मरळे (वय ३३) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण हद्दीतील मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीने चोरीच्या दुचाकी सांगोला, अहमदनगर, शिरूर, बीड आणि रायगड जिल्ह्यातील विविध व्यक्तींना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या कारवाईत पिंपरी, हिंजवडी, चतु:श्रृंगी, सांगवी, दापोडी, संत तुकारामनगर, भोसरी आणि शिरूर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण २२ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. पोलिसांनी चोरीच्या २२ मोटारसायकली जप्त केल्या असून उर्वरित काही वाहनांबाबत तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी, सहायक पोलीस उप निरिक्षक प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, चंद्रकांत भिसे, पोलीस हवालदार अजय डगळे, महादेव जावळे, विजय शेळकंदे, शिवराम भोपे, देवा राऊत, मनोज राठोड, सागर अवसरे, पोलीस शिपाई विजय जानराव, तेजस भालचिम, केशव चेपटे, सोहल चिखलकर, संदेश देशमुख, दिपक तांदळे यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group