पिंपरी (Pclive7.com):- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जन्मवर्षानिमित्त भक्तिमय वातावरणात ‘मोगरा फुलला’ या विशेष संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांच्या सुरेल गायनातून संत साहित्य आणि भक्तिगीते रसिकांना अनुभवता येणार आहेत. तसेच प्रख्यात व्याख्याते डॉ. गणेश शिंदे हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर आणि अध्यात्मिक विचारांवर मार्गदर्शन करणार आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नामस्मरणाने आणि अभंगांच्या सुरेल सादरीकरणाने रंगणारा हा भक्तिमय सोहळा सर्वांसाठी आनंददायी पर्व ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. रसिक नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत साहित्याचा आणि भक्तिरसाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संदीप वाघेरे यांनी केले आहे.




















Join Our Whatsapp Group