पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ ने अपहरण व जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत सहा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीसांनी याप्रकरणी सुरज शंकर चलवादी (वय २४ वर्षे रा. सिद्धार्थनगर मामुर्डी, दिपक दयानंद भंडगे (वय २४ वर्ष रा. झील चौक, डिएसपी वाईन्स समोर, न-हे), अविनाश अरुण वानखेडे (वय २६ वर्षे रा. झील चौक, डिएसपी वाईन्स समोर न-हे), प्रथमेश उर्फ प्रतिक हरीभाउ कंक (वय २७ वर्षे, रा. आदईगाव शेळकेची बिल्डींग ता. पनवेल जि. रायगड), विराज उर्फ सनी युवराज हिरवे (वय १९ वर्षे, रा. सिध्दार्थनगर मामुर्डी देहुरोड), ईसाक राजु काजापुरम (वय २८ वर्षे रा. सिध्दार्थनगर मामुर्डी देहुरोड) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी हे सोसायटी गेटजवळ उभे असताना आरोपींनी त्यांची रिक्षा अडवून जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या जवळील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा, मोबाईल फोन तसेच इतर साहित्य असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर यापूर्वीही जबरी चोरी, दरोडा आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस अंमलदार राजाराम लोणकर, महेश वायबसे, अमोल बोराटे, गणेश महाडीक, संतोष असवले, सचिन मोरे, गणेश सोनटक्के, अंजनराव सोडगीर, रामदास मेरगळ, शेखर खराडे, अमोल वेताळ, अमोल माटे, बाबाराजे मुंढे, दयानंद खेडकर, संदिप सुखदाणे, सचिन नागरे, प्रशांत सोनवणे, तांत्रिक विश्लेषक, पोलीस शिपाई त्रिनयन बाळसराफ, पोलीस हवालदार नागेश माळी, ननावरे यांनी केली आहे.




















Join Our Whatsapp Group