देहूगाव (Pclive7.com):- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पावन देहूनगरीत श्रावण शुद्ध एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ‘नमामि इंद्रायणी महाआरती’ भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इंद्रायणी नदीच्या स्वच्छता, संवर्धन आणि पावित्र्य जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

“धन्य देहूगाव पुण्यभूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीला साजेशा वातावरणात नगरप्रदक्षिणा आणि इंद्रायणी नदीची महाआरती पार पडली. वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार आयोजित या उपक्रमात भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

इंद्रायणी नदी ही संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तीपरंपरेशी जोडलेली पवित्र नदी आहे. नदीचे संवर्धन, स्वच्छता आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तीर्थक्षेत्र संवर्धन समिती, देहू यांच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून घाट स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत.




















Join Our Whatsapp Group