पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये ‘वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प’ या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पा संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने नम्रता मॅजिक या सोसायटीत प्रथमच वेस्ट मॅनेजमेंट याविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन मयुरी गोसावडे, रमेशशेठ काटे, सोसायटीचे सेक्रेटरी अभिजीत उल्हे व चेअरमन अशोककुमार शर्मा यांच्या वतीने करण्यात आले होते. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी हा उपक्रम संपूर्ण पिंपळे सौदागर प्रभागात राबविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.
यावेळी ‘माय ग्रीन बिन’चे डायरेक्टर अमित रॉय यांनी वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाअंतर्गत ओल्या कचऱ्यापासून आपण खत कसे बनवू शकतो यावर सविस्तर मार्गदर्शन केले. साधारण ३५० लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील मशिनद्वारे खत निर्मिती करण्यात येते. यात संकलित झालेला कचरा सोसायटी आवारात, गार्डन परिसरामध्ये खत म्हणून वापरण्यात येणार आहे.
या प्रकल्पाविषयी मार्गदर्शन करताना नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक सोसायटीने कचरा विलीगिकरण करून ओला कचरा आपल्या सोसायटी परिसरातच जिरवावा,त्यातून खत निर्मिती करावी. परंतु परिसरातील नागरिकांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत कसे बनवावे? किंवा ओला कचऱ्याचे काय करावे? याबाबत संभ्रम आहे. म्हणून अशाप्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. ओला कचरा ही एक खूप गंभीर समस्या आहे. म्हणून यावर आपण आजच योग्य तो तोडगा काढला पाहिजे. अन्यथा आपल्या पुढच्या पिढीसमोर हे एक न सुटणारे संकट म्हणून उभे राहिल. याकरिता पिंपळे सौदागर मधील प्रत्येक सोसायटीमध्ये वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प राबविण्यात यावे. पिंपरी चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर हे स्मार्ट शहर म्हणुन ओळखले जाते. आपल्या शहराला अजुन स्मार्ट शहर बनविण्यासाठी प्रत्येक सोसायटीमध्ये वेस्ट मँनेजमेंट प्रकल्पासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास आम्ही कायम सकारात्मक आहोत.
यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, निलेश पाटीलसर, साई वास्तु सोसायटीचे चेअरमन विशाल शिंदे, सेक्रेटरी कुंभारसर, मयुरी गोसावडे मॅडम, कॅस्टेलीया सोसायटी चेअरमन विजय विकास सर आणि साई प्रेम पार्क, जॅस्मीन, साई वैभव सोसायटीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group