नगरसेवक दीपक पोटे हे सिंहगड रस्त्यावरील मधुरिमा अपार्टमेंटमध्ये राहतात. दररोज रात्री घराच्या पार्किंगमध्ये ते गाडी लावतात. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पार्किंगमध्ये गाडी लावली होती. मात्र, सकाळी त्यांना पार्किंगमध्ये गाडी आढळून आली नाही.
शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्या, खून, हाणामाऱ्या होत आहेत. गुन्हेगारीचा आलेख वाढता असतानाच आता चोरट्यांनी चक्क लोकप्रतिनिधीचीच गाडी चोरून नेल्याने पोलिसांसमोर त्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दत्तवाडी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group