पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ मधील बालामल चाळ परिसरामध्ये अमृत योजनेअंतर्गत कामे महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आली आहेत. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या मार्फत सातत्याने या कामांचा पाठपुरावा करून कामाची सुरुवात करण्यात आली आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आज येथे सुरू असलेल्या जलनिस:रण नलिका टाकण्याच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी पाणीपुरवठा विषयक कामे करुन अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटकरण करण्याच्या सुचना संदीप वाघेरे यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी स्थापत्य विभागाचे उपअभियंता विनय ओहोळ, मोमीन, पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता सुनिल आहिरे,.जलनिस्सारण विभागाचे सचिन मगर, सामजिक कार्यकर्ते राजेन्द्र वाघेरे, श्रीकांत वाघेरे व नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group