पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी आज चिंचवड येथील मोरया गोसावी मंदीरात बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी श्रींची मनोभावे पुजा करत अभिषेक देखील केला. मावळमधून पार्थ यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांनी आज घेतलेल्या बाप्पांच्या दर्शनामुळे एकप्रकारे निवडणूकीच्या प्रचाराचा श्रीगणेशाच केला असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी पार्थ यांच्यासोबत माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, युवा नेते संदीप पवार तसेच राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते. मोरया देवस्थानच्यावतीने यावेळी पार्थ यांचे स्वागत करण्यात आले. मोरयांचे दर्शन घेतल्यानंतर पार्थ यांनी शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीला सुरूवात केली आहे.

यावेळी बोलताना पार्थ पवार यांनी मावळच्या उमेदवारीबाबत बोलण्यास नकार दिला. परंतू मी पक्षाचे काम करत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून पार्थ यांनी पिंपरी चिंचवडचा दौरा सुरू केलायं. काल राष्ट्रवादीने शहरात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. तर आज मोरयांचे दर्शन घेऊन नेत्यांच्या भेटीगाठीला सुरूवात केल्यामुळे त्यांची मावळची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.






















Join Our Whatsapp Group