पिंपरी (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रचारात सर्वात महत्वाची भूमिका स्टार प्रचाराकांकडून बजावली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहिर केली आहे. यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह ४० स्टार प्रचारकांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहिर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला, डी.पी.त्रिपाठी, सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, यांच्यासह ४० नेत्यांचा त्यात समावेश आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश केले अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांच्या नावाचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. कोल्हे यांना राष्ट्रवादीने शिरूरची उमेदवारी दिली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे अमोल कोल्हे यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यांचं बोलणं, त्यांची भाषणे सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लोकांमध्ये त्यांची वाढती क्रेझ दिसून येत आहे. आता अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक झाल्यामुळे शिरूरसह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची तोफ धडाडणार आहे.






















Join Our Whatsapp Group