पिंपरी (Pclive7.com):- पुरोगामी विचारांची पायाभरणी महात्मा जोतिबा फुले यांनी केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचे काम महात्मा जोतिबा फुले यांनी केले. फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवूनच महाराष्ट्र प्रगती पथावर आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील महात्मा फुले स्मारक येथील फुले यांच्या साठे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संग्राम तावडे, गिरीजा कुदळे, मयुर जयस्वाल, मकरद्वज यादव, शहाबुद्दीन शेख, संदेश बोर्डे, विशाल कसबे, किशोर कळसकर, लक्ष्मण रुपनर, हिरामण खवळे, संदेश नवले, आबा खराडे, सुनील राऊत, आनंदराव सोंडकर, अनिरुध्द कांबळे, अर्जुन खंडाळे, दिलीप पांढरकर, हर्षवर्धन पांढरकर, सतीश भोसले, विष्णू नेवाळे, बाळासाहेब साळुंखे, परशुराम गुंजाळ आदी उपस्थित होते.
सचिन साठे म्हणाले की, महात्मा फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मनुस्मृती नाकारून स्वतःच्या पत्नीला प्रथम शिक्षित केले देशाला समतेचा मार्ग दाखविला. समतेचे हे चक्र उलटे फिरवण्याचे काम हे प्रतिगामी सरकार करीत आहे त्यांना सुज्ञ जनता नाकारेल असाही विश्वास साठे यांनी व्यक्त केला.





















Join Our Whatsapp Group