पिंपरी (Pclive7 com):- शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी श्री राम नवमीचे औचित्य साधून चिंचवड गावातील श्री राम मंदिरात दर्शन घेतले. तसेच शहर आणि परिसरातील मंदिरांना भेटी देऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी शिवसेनेचे विभागीय संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, रामभाऊ गोलांडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.

श्री रामनवमीचे औचित्य साधून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड आणि परिसरातील मंदिरांना भेटी दिल्या. त्यामध्ये सुरुवातीला देहूगावातील श्रीराम मंदिर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर, चिंचवड गावातील आणि गोलांडे कॉलनी येथील श्री राम मंदिरात दर्शन घेतले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक आणि दुकानदारांशी चर्चा केली. देहूगावातील लक्ष्मीनगर, माळीनगर येथील कृष्ण मंदिर आणि हनुमान मंदिरातही दर्शन घेतले.






















Join Our Whatsapp Group