पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आरपीआय कवाडे गट, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज भोसरी विधानसभेत गावभेट दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून संपूर्ण भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीमय वातावरण झाल्याचे आज पहायला मिळाले.

डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आज रविवार निमित्त भोसरीत गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार विलास लांडे यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. सकाळी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या निवासस्थानी जाऊन अमोल कोल्हे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण लांडगे परिवार उपस्थित होता. विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक अँड. नितीन लांडगे, ज्येष्ठ नेते वसंतनाना लोंढे, अंकुशराव पठारे, पंडित गवळी तसेच भोसरीतील ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर कोल्हे यांनी मोशीगावाला भेट दिली. त्याठिकाणी माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, उत्तम आल्हाट तसेच मोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. दरम्यान मोशी प्राधिकरण सेक्टर ४, ६, ९, ११, १३ येथील नागरिकांशी अमोल कोल्हे यांनी संवाद साधला. शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे यांनी तेथील संयोजन केले होते. त्यानंतर बनकर वस्ती येथे राहुल बनकर, गायकवाड वस्ती येथे रमेश गायकवाड, शिवाजीवाडी येथे गणेश साहेबराव सस्ते, सस्तेवाडी येथे गणेश शशिकांत सस्ते, गंधर्वनगरी, आदर्शनगरी येथे आण्णा तापकीर यांच्या पुढाकाराने अमोल कोल्हे यांनी नागरिकांशी संवाद साधला.

तसेच तळवडे गावातील नागिराकांची अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. त्यावेळी नगरसेवक पंकज भालेकर, प्रविण भालेकर, पौर्णिमा सोनवणे, संगिता ताम्हाणे, तसेच ग्रामस्थ हजर होते. घरकुल येथील रहिवाश्यांची देखीलअमोल कोल्हे यांनी भेट घेतली. त्यावेळी माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, अशोक मगर, तुषार सोनवणे उपस्थित होते. अमोल कोल्हे यांनी निगडी येथील नागरिकांच्या देखील भेटी घेतल्या. त्यावेळी नगरसेविका सुमन पवळे, दत्ता पवळे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गावभेटी दौऱ्याच्या शेवट भोसरीतील दिप लॉन्स येथे मेळाव्याने करण्यात आले होते. भोसरी विधानसभेतील माजी सैनिकांचा मेळावा या ठिकाणी घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. माजी सैनिकांच्या समस्या, अडचणी त्यांनी समजून घेतल्या. यावेळी माजी सैनिकांनी या निवडणुकीत अमोल कोल्हे यांच्याच पाठीशी उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले.























Join Our Whatsapp Group