पिंपरी (Pclive7.com):- ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड शहर आघाडी व युवा आघाडी तर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड शहर आघाडीचे अध्यक्ष दिपक भोजने, युवा आघाडीचे महावीर काळे, मराठवाडा विभाग अध्यक्ष सुनील बनसोडे, शहर उपाध्यक्ष संजय नाईकवडे, दादासाहेब कोपनर, संजय कवितके, राम दुधभाते, गोवर्धन कांबळे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष शिवराम ठोंबरे, युवा आघाडी सचिव संतोष पांढरे युवा उपाध्यक्ष विजय महानवर, विठ्ठल देवकाते, दाजी वायकुळे, ओम नाईकवडे, बाबा पाटील, रोटे सर व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच दुपारी महिला दुचाकी रॅली भक्ती शक्ती चौक पासुन सुरुवात झाली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होळकर स्मारक चौक मोरवाडी पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. रॅलीचे स्वागत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ पिंपरी चिंचवड शहर तर्फे करण्यात आले. रॅली महिला भगिनींना शीतपेय (रसना) वाटप करण्यात आला. यावेळी दिपक भोजने, सुनिल बनसोडे, महावीर काळे, संजय नाईकवडे, विठ्ठल देवकाते, प्रदिप वाघमोडे, ओम नाईकवडे, रोटे सर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group