पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान, आठवडे बाजार, तसेच कृष्णा चौक व इतर उपनगरात कवींनी कवितेच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली. यामध्ये प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १२८ व्या जयंती निमित्त आभिवादन करुन भिंत्तीपत्रके, पथनाट्यव्दारे, घोषवाक्या व्दारे, स्पिकरव्दारे, कवितेतून, जनजागृती करण्यात आली. संविधानाने दिलेले आधिकार, कर्तव्यासाठी तसेच देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा. त्यामुळे आपल्या परिसराची जाण व नागरी समस्या जाणून घेणारे अभ्यासू प्रतिनिधी निवडून दिले जातील व आपल्या नागरी समस्या संसदेत मांडल्या जातील.
जनजागृतीमध्ये नागरिकांना आव्हान करण्यात आले की, आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका, मतदान सर्वश्रेष्ठ काम, घ्या मातृभुमीची आण करा मतदान, आपलं मत विकासाला मत, तुम हो महान करके मतदान, ना जातीवर ना धर्मावर बटन दाबा कार्यावर, मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, मतदानाची किंमत नाही घेणार पण मतदान मात्र जरूर करणार, अशा विविध प्रकारच्या घोषणेव्दारे, भित्तिपत्रकाव्दारे,रँलीद्धारे, स्पीकरव्दारे कवींनी कवितेतून नागरीकांना आव्हान केले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या, मिरवणुकीत, व कार्यक्रमात देखील पत्रके वाटुन जनजागृती करण्यात आली. आपल्याला शासनाने दिलेल्या सुट्टीचा उपयोग फिरण्यासाठी, व मौजमजा करण्यासाठी न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आव्हान मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी केले.
कवी सुहास घूमरे यांनी, “तुमच्या मताला किंमत असते, घटनेनेत तुम्हाला दिलेली हिम्मत असते, मत म्हणजे मूक आभिव्यत्तीही असते, हिच तर लोकशाहीची शक्ति असते” तर कवी शरद शेजवळ यांनी, “दानामध्ये दान महान, मतदान श्रेष्ठदान, मतदान कर मतदारा, दान कर दान.घटनेचा ठेवूनी मान, तू देई योगदान. तर जेष्ठ कवि, साहित्यीक, तुकाराम पाटील यांनी असे आपल्या कवितेतून सांगितले की “मतदान आहे आधिकार थोर, करा मतदान करूनी विचार. आपल्या मताचे मालक आपण, ओळखु आता सज्जन दूर्जन, भारत देशाचे करू संरक्षण, करायला सांगू योग्य कारभार.. कवयित्री मधुश्री ओव्हाळ यांनी ही कवितेतून जनजागृतीचा संदेश दिला.
यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, उपाध्यक्ष डॉ.आभिषेक हरीदास, शहराध्यक्ष जोगदंड यांनी आपल्या कपड्यावरही घोषवाक्य लिहिले होते. व मतदान करण्याचे आव्हान करत होते. पश्चिम महाराष्ट्र महिला अध्याक्षा संगिता जोगदंड मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, मुळशी विभाग प्रमुख संजनाताई करंजवने, पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा गुलशन नाईकुडे, कामगार कल्याण मंडाळाचे केद्र संचालक प्रदिप बोरसे, कवी शरद शेजवळ, सुहास घुमरे, जेष्ठ कवी तुकाराम पाटील, कवयित्री मधुश्री ओव्हाळ, युवक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, ऋतूजा जोगदंड, महाराष्ट्र सचिव जयश्री गागरे, क्षमा धूमाळ, नियाज शेख,सामाजिक कार्यकर्ते आनिल पालकर, जालंदर दाते, जनार्धन बोरले, प्रकाश बंडेवार, प्रदीप गायकवाड, एस.डी.विभुते, अक्षय जगदाळे, नितीन जोगदंड, पि.पि.पिल्ले अादी मान्यवर सहभागी झाले होते.