पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. थेरगाव येथील जय हनुमान श्री शनिदेव सेवा ट्रस्टच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन झाले. या शिबाराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी परिसरातील ६७ जणांनी रक्तदान केले.
शहरात विविध ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. थेरगाव येथील जय हनुमान श्री शनिदेव सेवा ट्रस्टच्या माध्यमातून संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी आज विविध कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी केली. सकाळी ६ वाजता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत भव्य रक्तदार शिबीराचे आयोजन देखील केले होते. हे शिबीरपिंपरीतील नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी ६७ जणांनी रक्तदान करून शिबीरात सहभाग नोंदविला.