पिंपरी (Pclive7.com):- नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये दिलेल्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवून देशभरातील जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली होती. त्यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. आता जनतेचा त्यांच्यावरील विश्वासच उडाला आहे. सर्वसामान्यांचा विश्वासघात करणाऱ्या भाजप सेना युतीला सुज्ञ मतदारांनी पराभूत करावे. मोदी हटवा, देश वाचवा असा नारा देत काळेवाडी येथे लोकशाही बचाव समितीने मतदारांना आवाहन केले.
काळेवाडी विभाग येथे लोकशाही बचाव समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चौकसभा बैठक झाली. यावेळी लोकशाही बचाव समितीचे प्रमुख मानव कांबळे ,माजी नगरसेवक मारूती भापकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक संतोष कोकणे, विनोद नढे, नगरसेविका उषाताई काळे तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जगताप, बारा बलुतेदार महासंघाचे प्रतापराव गुरव, बारा बलुतेदार युवा प्रदेशाध्यक्ष विशाल जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिलीप काळे, संभाजी ब्रिगेडचे वैभव जाधव, आप पार्टीचे अध्यक्ष प्रकाश पठारे, सचिन कळकुंभे, शाम काळे, सौ संगिताताई पवार, सौ वैशालीताई राऊत, शानभाई शेख, संजय पगारे, आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group