पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. २४ एप्रिल) सायंकाळी ५.३० वाजता पिंपळेनिलख, भैरवनाथ मंदिरासमोर, पिंपळेनिलख गावठाण येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी उमेदवार पार्थ अजितदादा पवार, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, कार्याध्यक्ष गौतम आरकडे, एनएसयूआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, काँग्रेस अल्पसंख्यांक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम मुजावर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा निरीक्षक घनश्याम शेलार तसेच शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, कवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिलेली आहे.






















Join Our Whatsapp Group