पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेच्या रणसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणारे चिंचवड विधानसभेचे आमदार आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावला. पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळेत आज सकाळी त्यांनी मतदान केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात किमान 60 ते 65 टक्के मतदान होईल. चिंचवड विधानसभेतून महायुतीच्या उमेदवाराला पावणेदोन लाखांची आघाडी मिळेल. राज्यात आणि देशात सध्या भाजपा म्हणजेच मोदींचीच हवा असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.