भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भोसरी गावठाण येथील मतदान केंद्रात त्यांनी आज सकाळी मतदान केले. शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरली होती. निवडणुकीपूर्वी महेश लांडगे नेमकं काय करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडगे यांच्याशी केलेल्या दिलजमाईमुळे आढळराव पाटील यांचे मोठे टेन्शन दूर झाले होते.
मतदानानंतर बोलताना महेश लांडगे म्हणाले की, यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. नक्कीच मतदानाची टक्केवारी यावेळी वाढणार आहे. भोसरी विधानसभेतून युतीचे उमेदवार आढळराव पाटील यांना ५० हजाराहून अधिक मताधिक्क्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान शिरूरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना कडवे आव्हान दिले आहे. आता मतदार नेमका कुणाला कौल देणार हे येत्या २३ तारखेला स्पष्ट होणार असून सर्वच राजकीय वर्तुळाची लक्ष शिरूरच्या निकालाकडे लागले आहे.






















Join Our Whatsapp Group