पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर चहासाठी थांबलेल्या लग्झरी बसमधील व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे तसेच हिऱ्याचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वेशांतर करुन मध्यप्रदेश येथून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. अटक आरोपींकडून सोन्याची बिस्किटे आणि कार असा ३६ लाखाचा ऐवज जप्त केला आहे. दिपक पुरुषोत्तमलाल सैनी (२४, रा. हैदर वस्ती, जुनी पोलीस लाईनजवळ, सिकंदराबाद, तलंगणा) याने फिर्याद दिली होती.
भवानी एअर लॉलेस्टीक प्रा.लि. या कुरीयर कंपनीचे सोने, हि-याचे दागिने व रोख रकमेचे पार्सल हैद्राबाद येथून मुंबई येथे खाजगी प्रवासी लग्झरी बसने घेवून जात होते. बस सकाळी चहा व नास्ता करणेकरीता हॉटेल न्यु सागर, पुनावळे, वाकड येथे थांबली होती. त्यावेळी सैनी हा खाली उतरला असताना त्याने त्याची सोन्याचे दागीने, सोन्याची बिस्कीटे, हिरे व रोख रक्कम असलेली पिशवी सॅक बॅग अज्ञात इसमांनी चोरली. हिंजवडी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला.
हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सतिश कांबळे हे या गुन्हयाचा तपास करीत होते. सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे गुन्हा करणा-याची ओळख पटली. सहायक निरीक्षक कांबळे यांना खबऱ्यामार्फत गुन्हेगारांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक देवास मध्यप्रदेश येथे रवाना झाले.
इटावा, देवास, मध्यप्रदेश येथे आठ दिवस सापळा रचुन, वेशांतर करुन मुस्ताक समशेर खान यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याचेकडे सखोल तपास करून वाहन चालक राजेंद्र हरिश्चंद्र सोनी (३८, रा.गायत्री कॉलनी, धरमपुरी तहसिल कचेरी समोर, धरमपुरी, जि.धार, मध्यप्रदेश राज्य) आणि ईस्माईल बाबु खान (३३, रा.काळी बावडी, धरमपुरी, जि.धार, मध्यप्रदेश) या दोघांना अटक केली. त्यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी एकुण २५ लाख रुपयाची ७३१ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे व आकरा लाख रुपयाची गुन्हयात वापरलेली मारुती एसक्रॉस कार जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचेविरुध्द हैद्राबाद, तेलंगना राज्य, मुंबई पुणे इत्यादी ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
हि कामगिरी पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, उपआयुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त सतिश पाटील, निरीक्षक भानुदास जाधव, निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक सतिश कांबळे, उपनिरीक्षक हर्षल कदम, अशोक गवारी, नारायण जाधव, संजय गवारे, फारुक मुल्ला, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, किरण आरुटे, प्रविण दळे, हजरत पठाण, जमीर तांबोळी, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, दत्तात्रय बनसुडे, संपत निकम, धर्मराज आवटे, मंहमद गौस नदाफ, नितीन बहिरट, दादा पवार, धनराज किरनाळे, सावन राठोड, सचिन मोरे, राजेंद्र शेटे, महेंद्र तातळे, गणेश मालुसरे, दिपक खरात, प्रमोद हिरळकर तर हिंजवडी पोलीस स्टेशनकडील पोलीस कर्मचारी कुणाल शिंदे या पथकाने केली.



















Join Our Whatsapp Group