पुणे (Pclive7.com):- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे व मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता व्दिवेदी यांनी मतमोजणीच्या ठिकाणाची आज पहाणी केली. गुरूवार दि.२३ मे रोजी येथे मतमोजणी होणार आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी संदिप निश्चित, भारत संचार निगम लिमिटेडचे परदेशी, राखेलकर, सार्वजनिक बांधकामाच्या विद्युत विभागाचे उप कार्यकारी अभियंता शुल्क, वाघमारे, पोलिस निरीक्षक यशवंत गवारी उपस्थित होते.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान दि.२९ एप्रिल रोजी पार पडले. शिरूर आणि मावळ लोकसभेतील उमेदवारांचे भवितव्य या दिवशी मतपेटीत बंद झाले. शिरूरमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात झाली आहे. तर मावळमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात प्रमुख लढत झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या दोन्ही मतदार संघातील निकालाकडे लागले आहे. गुरूवार दि.२३ मे रोजी बालेवाडी येथे मतमोजणी होणार आहे.