दिघी (Pclive7.com):- लोकसभा निवडणूक आचारसंहिता काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांवर पाडापाडीची कारवाई महापालिकेने गुरुवारपासून (दि. १६) पासून सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने दिघी बापखेल येथील १० अनधिकृत आरसीसी बांधकामांवर कारवाई केली.
कारवाईत एकूण ७ हजार १३८. ४९ चौरस फूट आकाराचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. कारवाईत दिघीतील संत गजानन महाराजनगर येथील ७ आणि बोपखेल येथील गणेशनगरमधील ३ अनधिकृत बांधकामे पाडण्यात काम आली.
शहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता हेमंत देसाई, कनिष्ठ अभियंता के.ए.मगर यांच्यासह पालिकेचे पथक व पोलिसांनी ही कारवाई केली.