बारामती (Pclive7.com):- लोकसभेच्या काँग्रेसच्या मुंबईतील उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह अशा पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे.
बारामती येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीनंतर संबंधित पोस्ट या फेसबुकवरून डिलीट झाली असली तरी संबंधित व्यक्तीचे फेसबुक अकाउंट मात्र अद्यापही सुरू असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या संदर्भात बारामतीचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरज सावंत, वैभव पवार, पैगंबर शेख, सुनील बनसोडे, दत्ता तांबे, सूर्यकांत पिसाळ,संदीप मालुसरे, दीपक टेकाळे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.






















Join Our Whatsapp Group