पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरातील पहिला राजकीय पराभव घडवून आणण्याची कामगिरी मावळ लोकसभेचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. नवनिर्वाचित खासदार बारणे यांच्यासह पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या टिमने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी मावळच्या या विजयी टिमचे ठाकरे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे,आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, शहर प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे यांनी आज उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.शिवसेनेची ताकद अधिक जोमाने फडकावत विधानसभेलाही दणदणीत विजय मिळवायचा आहे अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.





















Join Our Whatsapp Group