पिंपरी (Pclive7.com):- संदिप वाघेरे युवा मंचच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ मधील गुणवंत तसेच गरजू विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार दि.२३ रोजी महापौर राहुल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तू वाटप (वह्या, कंपास) व इयत्ता १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवव्याख्याते अॅड.रविंद्र नथुराम यादव, नगरसेवक संदिप वाघेरे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, चंद्रकांत गव्हाणे, पंडित कापसे, शिवाजी वाघेरे, बन्सी नाणेकर, रामभाऊ कुदळे, रंजनाताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी सुमारे ३ हजार गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. ८० ते त्यापेक्षा जास्त टक्के गुण मिळविणार्या सर्व विद्यार्थ्यांचा पॅनड्राईव्ह व टॅब देऊन गौरव करण्यात आला. तर प्रथम श्रेणीतील नवमहाराष्ट्र विद्यालयातील १० वी च्या प्रथमेश लोहार ९५.२० टक्के तर जय हिंद कॉलेज मधील रितिका यादव ९४ टक्के गुण मिळविल्याबद्दल महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले. तर करण अंकुश अंबाड व साक्षी प्रशांत अमृतकर या अंध विद्यार्थ्यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पिंपरीगावचे व्यापारी घनशाम वर्मा यांचाही श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाला सेवाभाव वृत्तीने झकाळी दिल्याबाबत विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रसिद्ध शाहिर जालिंदर शिंदे आणि त्यांचे सहकारी यांचा पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे संयोजन संदिप वाघेरे युवा मंचचे हरिष वाघेरे, राजेंद्र वाघेरे, किरण वाघेरे, रोहित लालगे, शरद कोतकर, शुभम शिंदे, किरण शिंदे, आकाश चव्हाण, विठ्ठल जाधव, दिपक मुंगसे, स्वाती गायकवाड, अपूर्वा खोचाडे, प्रिती गायकवाड, रोहन वाधवानी यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश पवार यांनी केले.
























Join Our Whatsapp Group